नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरातील मतदार यादीतील नावे वगळण्यात येणाऱ्या मतदारांची सुनावणी नळदुर्ग शहरातच घेण्यात यावी त्याच बरोबर मतदार यादीत ओळखपत्र लिंक करीत आसताना आधारकार्डाचे बारकोड स्कॅन करुनच मतदारांची नोंद करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार तुळजापूर यांना एका लेखी निवेदनाव्दारे नागरीकांनी केली आहे.
सध्या नवीन मतदार यादयांचे काम मोठया प्रमाणात सुरु असून या मतदार यादया तयार करीत असताना गेल्या दोन महीन्यापूर्वी बीएलओ कडून शहरातील त्याच बरोबर संपूर्ण तुळजापर तालुक्याची मतदार यादयांच्या भागा नुसार स्वर्हे करण्यात आला आहे, यामध्ये संबंधीत भागातील मतदार हा त्यांनी दर्शविलेल्या ठिकाणी राहत आहे की नाही याची शहनिशा करण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे नळदुर्ग शहरातून ही हा सर्व्हे करीत असताना चुकीच्या मार्गाने सर्व्हे करण्यात आल्याने शहरातील शेकडो मतदारांची नावे हे त्यांनी दर्शविलेल्या ठिकाणी राहत नसल्याचे कारण दाखवून त्यांना ते दर्शविलेल्या ठिकाणी आपण राहत आहात की नाही याचा पुरावा संबंधीत निवडणुक विभागाकडे सादर करण्यासाठी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणुक अधिकारी यांनी शेकडो मतदारांना नोटीस बजावून त्यांची सुनावणी तहसील कार्यालय तुळजापूर येथे ठेवण्यात आली आहे. दरम्यान शहरातील अनेक मतदार हे कामासाठी बाहेर गावी किंवा बाहेरच्या शहरात राहत आहेत, त्यामुळे दिलेल्या नोटीस मध्ये केवळ एक दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना एका दिवसात किंवा तुळजापूरला जाणे येणे परवडणारे नाही. किंवा त्यांना येण्यास एक दिवसाचा अवधी पुरणार नाही. त्यांना सदर सुनावणीस राहता येणार नाही. त्यामुळे शहरातील ज्या मतदारांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यांना सुनावणीस हजर राहता यावे यासाठी स्थानिक ठिकाणी नळदुर्ग शहरातच सुनावणी घेण्यात यावी त्याच बरोबर मतदार यादीत ओळखपत्र लिंक करण्याकरीता निवडणुक आयोगाच्या ओळखपत्रा बरोबरच आधारकार्डचे बारकोड ही स्कॅन करुनच लिंक करण्यात यावे, कारण शहरातील अनेक मतदारांनी ज्यांची नावे दोन दोन शहरात किंवा गावात आहेत त्यांची बोगस आधारकार्ड ही लिंक करण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे या सर्व बाबीना आळा बसण्यासाठी आधार कार्ड चे बारकोड लिंक करुनच मतदार यादीत ओळखपत्र लिंक करावे व ज्यांची नावे वगळण्याच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे त्यांची सुनावणी नळदुर्ग शहरातच घेण्यात यावी अशी मागणी शहरातील माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक बसवराज धरणे, आमृत पूदाले, पत्रकार विलास येडगे, सुधीर पोतदार, दिपक काशीद यांच्या सह अन्य नागरीकांनी तहसीलदार तुळजापूर यांना लेखी नेिवदेन देवून केली आहे. दरम्यान तुळजापूर तालुक्यातील सुमारे 11 हजार 322 मतदारांना ते त्यांनी दर्शविलेल्या ठिकाणी राहत आसल्याचा पुराव सादर करण्यासाठी नोटीस बजावून त्यांना तहसील तुळजापूर येथे सुनावणीसाठी बोलाविण्यात आले आहे. अन्यथा सुनावणीस उपस्थीत हजर नसल्यास संबंधीत मतदारांची नावे मतदारा यादीतून कमी करण्यात येणार आसल्याचे नोटीस मध्ये बजावण्यात आले आहे. त्यामुळे या बजावण्यात आलेल्या नोटीस मुळे संपूर्ण तुळजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे, अत्ताच दिवाळी संपूर कांही दिवसाचा आवधी झाला आहे, दिवाळीसाठी आपल्या गावी आलेल्या मतदारांना पुन्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जावे लागल्याने पुन्हा त्यांना आता ही नोटीस बजावण्यात आली आसल्याने अशा मतदारांनी आता आठ दिवसात कसे परत यायचे हा प्रश्न ही तितकाच गंभीर बनला आहे, त्यांना सुटटी मिळणे कठीण झाले आहे त्यांमुळे तहसीलदार यांनी या सर्व बाबींचा विचार करुन सुनावणीचा कालावधी वाढवून देण्यात यावा अशी मागणी ही बहूसंख्य मतदारांनी केली आहे.