भूम (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील सरमकुंडी येथे एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. 17 नोव्हेबर रोजी घडली असून वाशी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, तालुक्यातील सरमकुंडी येथील विनोद त्रिंबक गायकवाड वय 40 वर्ष यांनी सरमकुंडी-तांदुळवाडी रोडवरील स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चिठ्ठी लिहून गळफास लावून आत्महत्या केली. विनोद गायकवाड हे शेती व ट्रॅक्टर, टेम्पो ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवले असून वैद्यकीय अधिकारी प्रमोद शिंदे यांनी शवविच्छेदन केले आहे. विनोद गायकवाड यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगी, आई, एक भाऊ असा परिवार आहे. चिठ्ठीत मी माझ्या समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही म्हणून आता आंदोलन करून कंटाळलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे लिहले आहे.


 
Top