तुळजापूर (प्रतिनिधी)-पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक 6.15 वाजता प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातनाम ओडिसी नृत्यांगना कविता द्विवेदी हिचा सांस्कृतिक सुरभीचा रंगारंग कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात  सरस्वती पूजन व दिपप्रज्वलाने करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावरती विद्यालयाचे उप प्राचार्य एस.एच. गायकवाड, एस. डी. खोब्रागडे, एम.पी. कुलकर्णी, सुनिता वाघमारे उपस्थित होते. 

या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, नवोदय परिवार उपस्थित होता.या कार्यक्रमाचे आयोजन स्पीक मेके अंतर्गत करण्यात आले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संस्कृतीमध्ये गीत, गायन, नृत्य याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व संवर्धन व्हावे हा आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये शास्त्रीय गायनाची आवड निर्माण व्हावी. याप्रसंगी वेगवेगळ्या शास्त्रीय गायनाची प्रस्तुती देऊन लोकांना मंत्रमुग्ध केले. त्यामध्ये मंगलाचरण, बटू नृत्य, रसाची उत्पत्ती असे वेगवेगळे सादरीकरण करून या नृत्यांमध्ये वेशभूषा व मुख अभिनय कसा महत्त्वाचा आहे हे लक्षात आणून देऊ सर्व रसिकांना खेळवून ठेवले.  पुष्पमुंडा व बेल्ट यावरून ओडीसी नृत्य ओळखावे सांगून शास्त्रीय नृत्यांमध्ये अभियानाला विशेष महत्त्व असल्याचे ही सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. आर. कराड यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी पुरुषोत्तम जोशी व हरी जाधव यांनी विशेष पुढाकार घेतला होता.


 
Top