तुळजापूर (प्रतिनिधी )- दिवाळीच्या सुट्यांन पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. श्री तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी दिवाळी पाडव्यापासून गर्दी वाढत आहे. गेली आठ दिवसांत बारा ते चौदा लाखांहून अधिक भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. शारदीय नवराञ उत्सव काळात करण्यात आलेले नियोजन आता दिसुन येत नाही याचा फटका भाविकांना गैरसोय होवुन बसत आहे. गर्दी पार्श्वभूमीवर सध्या मंदीर बावीस तास दर्शनार्थ खुले ठेवले जात आहे.
दिवाळीत आलेल्या सलग सुट्यांमुळे तिर्थक्षेञ तुळजापूर मध्ये पुणे, मुंबईसह शहरी भागातुन प्रचंड संखेने भाविक दर्शनासाठी आले होते. गेली आठ दिवसांपासून पहाटे एक वाजल्या पासुन दर्शनासाठी रांगा लागत आहेत. पहाटे लवकर दर्शन घडत असले तरी सकाळी दहा ते सांयकाळी पाच या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी तीन ते चार तास लागताहेत. भाविकांच्या वाढत्या गर्दी पार्श्वभूमीवर सर्वञ दरवाढ करुन व्यापारी भाविकांची अर्थिक लूट करीत आहेत. शितपेय पाणी बाँटल दुप्पट दराने विकली जात आहे. प्रतिबंधक खात्याचे अस्तित्व दिसुन येत नाही. -
वाहतुक नियोजन अभाव मुळे भाविकांचे हाल!
भाविकांचे वाहने मोठ्या संखेने येत असल्याने वाहतूक नियोजन कोलमडुन जात आहे. भाविकांच्या वाहनांची होणारी संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर नियोजन होणे गरजेचे असताना ते न झाल्याने भाविकांचे हाल होत आहेत. पोलिस महामार्ग शाखा अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. महामार्ग वाहतुक पोलिस वाहनांची गर्दी सोडुन जिथे गर्दी नाही ते वाहन थांबवुन विचारपूस करीत आहे. ती कसली चौकशी आहे हे कळुन येत नाही. शहरात अनेक मोठ्या संख्येने वाहन तळे असताना घाटशिळ वाहनतळाकडे सगळे वाहने जात आहेत. उर्वरीत वाहनतळे ओस आहेत. नियोजन अभाव प्रत्यय भाविकांना येत आहे. दुचाकी वाहने थेट मंदीरासमोर लावली जात आहेत.
अतिक्रमणांमुळे भाविक ञस्त !
मंदिर महाध्दार समोर फेरीवाल्यांची संख्या वाढली असून, फुटपाथवर मोठ्या संख्येने अतिक्रमणे झाल्याने भाविकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. महाध्दार समोर दुचाकी लावल्या जात आहेत. नारळ फोडले जात आहेत.