तुळजापूर (प्रतिनिधी)-  एकल महिला संघटना आयोजित राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धत लोकधार परांडा संघाने विजेतेपद पटकावले. त्यांना  51 हजार रुपये  देवुन गौरविण्यात आले. तर उपविजेतेपद प्रगती संघ सारोळा यांनी पटकावले. त्यांना  31 हजार रुपये पारितोषिक  देवुन गौरविण्यात आले. तर तृतीय स्थानवार, संघ तुळजाभवानी संघ सारोळा हे राहिले त्यांना रोख  21 हजार रुपये देवुन गौरविण्यात आले.

या स्पर्धतील विजेत्या संघास  माजी जिप अध्यक्ष  अस्मिताताई कांबळे, तुलसी महिला नागरी पतसंस्थाच्या चेअरमन नंदाताई पुनगुडे, तर अँड कल्पना ताई गायकवाड यांच्या हस्ते बक्षिसे देवुन गौरविण्यात आले. तुळजापूर तालुका क्रिडागंणावर झालेल्या या स्पर्धा यशस्वीतेसाठी एकल महिला संघटनाच्या तुळजापूर तालुका अध्यक्ष पार्वतीताई भगतवा त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम  घेतले. उस्मानाबादच्या अध्यक्ष जमीला तांबोळी, मुखेड तालुका अध्यक्ष माधवी बनसोडे, परांडा तालुका अध्यक्ष मंदा पाटील, चाकूर तालुका अध्यक्ष ठकूबाई अंधारे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष सीताताई सरवदे, बीड तालुका अध्यक्ष शिल्पा पंडित लोहारा तालुका अध्यक्ष रेश्मा कादरी यांनी परिश्रम घेतले.


 
Top