परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील अतितीव्र, गरजू आवश्यक असणाऱ्या दिव्यांगासाठी आज दि.3 रोजी समाज कल्याण विभाग जिल्हाशैल्य चिकित्सक धाराशिव व दिव्यांग उद्योग समूह यांच्या वतीने परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.

या शिबिरामध्ये 40 अस्तिव्यंग दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी करत असताना जिल्हा दिव्यांग तपासणी अधिकारी डॉ. अविनाश भोरे यांचे सहकार्य लाभले. दिव्यांगाचा उद्धार हाच दिव्यांग उद्योग समूहाचा आधार याप्रमाणे कार्य करणारे सामाजिक संघटना होय दिव्यांगाच्या वेळोवेळी अडीअडचणी समस्यावर उठाव करून दिव्यांगांना न्याय देण्यासाठी ही सामाजिक संघटना सतत कार्यरत असते आज दिव्यांग तपासणी करताना दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके, शहराध्यक्ष गोरख देशमाने, पत्रकार प्रकाश काशीद, मुजीब काझी, दिव्यांग उत्तम शिंदे, दत्ता रणभोर, समीर ओव्हाळ,उत्तरेश्वर शिंदे, आरोग्य मित्र बालाजी नेटके, सरकारी दवाखाना कर्मचारी एक्स-रे विभाग बापू बोरकर इतर सहाय्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.


 
Top