तुळजापूर (प्रतिनिधी) -धाराशिव जिल्हात यंदा सरासरी पेक्षा अत्यल्प पाऊस पडल्याने धाराशिव जिल्हा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी मंञी मधुकर चव्हाण  यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंञी  एकनाथ शिंदे यांना निवेदन देवुन केली.

माजी परिवहन मंञी मधुकर चव्हान यांनी मुख्यमंञी  यांना दिलेल्या निवेदनात म्हटल आहे कि, यावर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला असून शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. जिल्हाधिकारी यांनी 42 मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस खंड पडल्याने विमा कंपनीला 25% अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु यापैकी काहीही झाले नाही.

धाराशिव जिल्हयामध्ये धाराशिव,लोहारा व वाशी तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु तुळजापूरसह उर्वरित तालुक्यात सुद्धा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ जाहीर करणे गरजेचे व आवश्यक होते. तरीही जाहीर केला नाही. आवश्यक पाऊस झाल्या नसल्याने रब्बी पेरणी करणे अशक्य आहे. अशा परस्थितीत शेतकऱ्यांना प्राधान्याने पीकविम्यासह शासनाने दुष्काळी मदत करावी, त्याच बरोबर पाणी टंचाई, जनावरांना चाऱ्यांची व्यवस्था करून मजुरांना काम पुरवावे. तरी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा असे म्हटले आहे.


 
Top