परंडा (प्रतिनिधी) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) परंडा तालुक्याच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी पक्षनेते खा.रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. 3) दुपारी शहरातील विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व तहसिलदार घनश्याम आडसूळ यांना निवेदन देण्यात आले .तसेच मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबा दिला .यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. 

यावेळी राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे ,आयटी सेल जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे, उत्तम ओव्हाळ, बाबा गायकवाड, तानाजी सोनवणे, दादा सरवदे, संजिवन भोसले, काशिनाथ सातपुते, धनाजी यशवद, आण्णासाहेब भालेराव, संतोष चतु, बबन भोसले, हनुमंत शिंदे, गणेश रंदील, लखन सरवदे, विलास भोसले, बाबासाहेब शिंदे, विकास गोमासे, शहाजी निकाळजे,  श्रावण दाभाडे, शहाजी दाभाडे, दिपक ठोसर, निलेश गायकवाड, वसंत चोळसे, अविनाश ओव्हाळ, संजय यशवद, तात्या भोसले, दादा बगाडे, दत्ता शिंदे, भुषण बसवंत, भिमराव भोसले, चंद्रकांत परिहार, सुनिल आडाळे, विश्वास साळवे, अभिजित बनसोडे आदी उपस्थित होते.


 
Top