धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुल या ठिकाणी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ज्या स्पर्धकांनी मॅरेथॉन साठी नाव नोंदणी केली आहे त्यांनीच टी-शर्ट, बिब इत्यादीचे किट घेण्यासाठी यायचे आहे तरी नोंदणीकृत स्पर्धकांनी किट घेण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

26 नोव्हेंबर रोजी पहाटे ठीक 5 वाजता स्पर्धकांनी श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावरती उपस्थित राहायचे आहे. सकाळी ठीक सहा वाजता वेळेवरती या स्पर्धेला सुरुवात. माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सदरील मॅरेथॉन 5 किलोमीटर, 10 किलोमीटर व 21 किलोमीटर अशा तीन प्रकारात होणार आहे.धाराशिव हाफ मॅरेथॉन चा मार्ग पुढील प्रमाणे - श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल या ठिकाणाहून मार्गस्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक (सेंट्रल बिल्डिंग), छत्रपती संभाजी राजे मार्ग (डी आय सी रोड), राजमाता जिजाऊ चौक (बार्शी नाका), हनुमान चौक, हातलाई देवी, घाटंग्री रोड व त्याच मार्गावरून परत येत नगरपालिकेच्या समोरून श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल या ठिकाणी समाप्ती. 

स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना मेडल देण्यात येणार आहे. सदरील स्पर्धेच्या मार्गावरती स्पर्धकांसाठी पाण्याची व  व्यवस्था करण्यात आलेली आहे. मॅराथॉनच्या मार्गावरती ॲम्बुलन्स ( रुग्णवाहिका) व्यवस्था पुढील प्रमाणे -श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, महात्मा बसवेश्वर चौक (सेंट्रल बिल्डिंग), राजमाता जिजाऊ चौक (बार्शी नाका), हातलादेवी पायथा या ठिकाणी करण्यात आलेली आहे.


 
Top