भूम (प्रतिनिधी) - जवळा (नी.) येथील बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24 चा सहाव्या गळीत हंगामास गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार राहुल महारुद्र मोटे यांच्या शुभहस्ते हस्ते दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.

बाणगंगा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील यंदा उपलब्ध असलेल्या सर्व उसाचे गाळप केल्याशिवाय कारखान्याचा गळीत हंगाम बंद केला जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांना योग्य दर दिला जानार असल्याचेही यावेळी माजी आमदार राहुल मोटे यांनी सांगितले. यावेळी आयान मल्टीट्रेड एलएलपीचे संचालक सचिन सिनगारे,  व्हाईस चेअरमन महादेव खैरे, जनरल मॅनेजर संतोष तोंडले,  रणवीर राहुल मोटे, कारखान्याचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब गोरे, दादासाहेब पाटील सोनारीकर, डीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन मधुकर मोटे, संचालक संजय पाटिल आरसोलीकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत पाटोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजिनाथ पालके, प्रवीण खटाळ, दयानंद शिंदे, भगवान पाटिल, राजकुमार घरत, श्रीराम खंडागळे, अतुल शेळके, भाऊसाहेब चोरमले, भाऊसाहेब खरसडे, विनोद नाईकवाडी, आबासाहेब मस्कर, सर्व संचालक, खातेप्रमुख, कर्मचारी, ऊसतोड ठेकेदार, ऊसतोड मजूर, शेतकरी उपस्थित होते.


 
Top