वाशी (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. आमरण उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाशी येथे मराठा समाजाचा वतीने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना दिर्घायुष्य लाभावे व मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी समस्त महिलांनी साकडे घालुन वाशी येथील काशी विश्वनाथ मंदिरात महाआरती केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे पाटील, मुलगी पल्लवी मनोज जरांगे पाटील, बहिण भारती संजय कठारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी काशी विश्वनाथ मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. देत कसे नाही मराठा आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही, जय भवानी जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापच, या घोषणेने परिसर दणाणुन गेले होते. हि पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्या नंतर पल्लवी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले. यावेळी शहरातील महिला, मुली, पुरुष तसेच सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या बहिण भारती संजय कठारे व मुलगी पल्लवी मनोज जरांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


 
Top