धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील लेडिज क्लबच्या बाजूला गेल्या 40 वर्षापासून चहाचे हॉटेल चालविणाऱ्या मुद्रीकाबाई दिवे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धाराशिव शहरात धाडसी महिला म्हणून मुद्रीकाबाई यांची ओळख होती. या रोडला शाळा, कॉलेज असल्यामुळे मुलांचे भांडणे असो किंवा एखाद्या मुलींची कोण छेड काढत असेल तर मुद्रीकाबाई तेथे धावून जात असत. त्यामुळे परिसराबरोबरच मुद्रीकाबाई यांचे नाव शहरात पसरले. मुद्रीकाबाई शहरातील एक चालता बोलता इतिहास होता असे म्हणायला हरकत नाही.सर्वाना आपुलकीने बोलणा-या मुद्रीकाबाई होत्या. आर.पी. कालेज, मल्टीपरपज, भोसले हायस्कुलच्या 1975 ते 2023 पर्यंतच्या अनेक आजीमाजी विद्यार्थ्यांना त्या मुलासमान बोलायच्या.