तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात मराठा समाजाचा वतीने महिलांचा भव्य मोर्चा शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी काढुन राजेशहाजी महाध्दार येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना दिर्घायुष्य लाभावे व मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी समस्त महिलांनी साकडे घालुन महाआरती केली. या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुमित्रा जरांगे पाटील सहभागी झाल्या होत्या.
यामोर्चात सर्व जाती धर्म पंथाच्या महिला, बार असोशिऐशनचे सर्व वकील, सर्व पक्षाचे पदाधिकारीसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.छञपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संभळाच्या वाद्याचा गजरात या मोर्चास आरंभ झाला. या मोर्चाच्या अग्रभागी घोडेवर छञपती शिवाजी महाराज, राजमाता म़ाँ जिजाऊ वेशात बालके होते.
परिसरातील चौकातुन या भव्य मोर्चाची सुरुवात झाली. देत कसे नाही मराठा आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही, जय भवानी जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय जय भवानी जय शिवराय “छातीवरती बसुन घेवू मराठा आरक्षण “ या घोषणेने दणाणुन गेले होते. हा मोर्चा भवानी रोड मार्ग श्रीतुळजाभवानी महाद्धार समोर आल्यानंतर समस्त महिलांच्या हस्ते आई तुळजाभवानीस साकडे घालुन जरांगे पाटलांना उत्तम आरोग्य लाभावे व मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी महाआरती करण्यात आली. नंतर श्रीतुळजाभवानी मंदीर पासुन हा मोर्चा तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. येथे महिलांनी तहसिलदार बाळासाहेब बोळंगे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.