भूम (प्रतिनिधी)-भूम खर्डा रोडवर ईट गोलाई चौकामधील रामेश्वर येथील रामगंगा प्रकल्पामध्ये कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात यावे. गोरमाळा माथा ते सोनगिरी साठवण तलाव कालव्यामधील शेतकऱ्यांना 2023 च्या रेडीरेकनर नुसार भूभाडे देण्यात यावे. तालुक्यातील या अगोदर भूभाडे दिलेल्या शेतकऱ्यांना वाढीव भूभाडे देण्यात यावे. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी काल मर्यादा ठरून प्रकल्प पूर्ण करण्यात यावा. या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आलेला होता. यावेळी निवेदन नायब तहसीलदार प्रवीण जाधव, उपसा सिंचन अभियंते अमृत सांगडे हे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी तानाजी पाटील, अमृत भोरे, अनिल भोरे, भैरट सर, विजय पाटील, दत्तात्रय चव्हाण, राहुल पाटील, महेश लावंड गजानन सोलंकर, भरत मस्के,शरद शिंदे ज्ञानेश्वर नरके, शिवाजी उगलमूगले, तात्या दराडे,प्रशांत गोफने अशोक गायकवाड, मधुकर अर्जुन विनोद वरळे, नानासाहेब लावंड दत्तात्रय लावंड असे अनेक वरुड, पाडोळी, सुकटा, रामेश्वर, उळूप येथील शेतकरी उपस्थित होते.
रामेश्वर येथील राम गंगा प्रकल्पात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील पाणी सोडण्याची तरतूद व गोरमाळा माता ते सोनगिरी साठवण तलाव भरण कालव्यातील खोदलेल्या जमिनीच्या भूभागासाठी चालू रेडी टेकनर दरा प्रमाणे भूभाडे आकारण्यात यावे या दोन मागण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजी नगर व महामंडळ कार्यालय संभाजीनगर यांच्या कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवण्यात येईल व त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
अमृत सांगडे
सहाय्यक कार्यकारी अभियंता पाटबंधारे धाराशिव.