धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी क्रीडा संकूल येथे 16 ते 20 नोंव्हेबर 2023 रोजी संपन्न झालेल्या धाराशिव जिल्ह्यासाठी 5 दशकानंतर 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 कुस्तीचा आखाडा कुस्ती प्रेमींसाठी उपलब्धी देणारे दिमाखदार आखीव रेखीव नियोजनाचे आयोजक अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सुधीर केशवराव पाटील यांचा आयोजनासाठी धाराशिव जिल्हा संस्कार भारती समितीच्या कृतज्ञता सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधा प्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक कलाध्यापक शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ, संस्कार भारती जिल्हा समिती जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा संगीतविधा प्रमुख सुरेश वाघमारे सुंभेकर आदि जिल्हा संस्कार भारती समिती सदस्य उपस्थित होते.


 
Top