उमरगा (प्रतिनिधी)- कर्नाटक राज्यातील नरोना ता. आळंद जि. गुलबर्गा येथे रविवार दि. 26 नोव्हेबर 2023 रोजी दु. 3 वाजून 53 मी. कार्तिक स्वामीचे दर्शन सुरु असून ते सोमवार दि 27 नोव्हेंबर 2023 दु. 1 वाजून 35 मि.पर्यंत राहणार आहे. 

स्कंद पुरानातील उल्लेखाप्रमाणे महादेव पार्वतीदेवीचे मोठे पुत्र भगवान कार्तिक स्वामी यांचे दर्शन कार्तिक महिण्यातील कृतिका नक्षत्र काळात दर्शन घेतल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होते.  यावर्षी या कार्तिक महिन्यात वरील वेळेत कृतिका नक्षत्र असल्याने दर्शनाचा दुर्मिळ योग आहे. पुरानातील उल्लेखाप्रमाणे पुरुष भक्तांना वर्षभर स्वामीचे दर्शन घेता येते पण महिलांना नाही. परंतू कृतिका नक्षत्र काळात या दिवशी महिलांना सुद्धा दर्शन घेता येते. विशेषतः स्वामी दर्शनाने भक्तांना आरोग्य, आर्थिक व राजकीय क्षेत्रात मनोकामना पूर्ण होतात. नरोना येथे 8 पाण्याची नैसर्गिककुड असून तेथील कार्तिक कुंडात मलिकार्जून  मंदिराखाली पाण्यात कार्तिक स्वामीचे विलोभनीय मंदिर आहे. तरी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्तिक स्वामी यात्रा कमिटी नरोना तर्फे करण्यात आले आहे.


 
Top