परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालया मध्ये रविवार दि.26 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी तथा संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने वरिष्ठ लिपिक बाबासाहेब क्षीरसागर बबन ब्रह्मराक्षस दिपक ओव्हाळ उत्तम माने भागवत दडमल आदि कर्मचारी उपस्थित होते.