भूम (प्रतिनिधी)-स्वयंभू शिक्षण प्रयोग संस्थेमार्फत सुरू असणारा फेअर फॉर ऑल या प्रकल्पाअंतर्गत भूम येथे तालुकास्तरीय कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते. यासाठी कृषी विभाग मुंबईचे गणेश शेंडगे तसेच संस्थेचे ओंकार भोरे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी बद्दल व शेतीपूरक व्यवसायाबद्दल महिलांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी मधून दिला जाणारा लाभ तसेच शेतकरी उत्पादक कंपनी मधील  सभासदांसाठीचे फायदे यावेळी सांगण्यात आले. सराई सखी शेतकरी उत्पादक कंपनी ही महिलासाठी मिळून केलेली डाक मार्केट आहे. त्यामध्ये एकूण 250 सभासद आहेत फेअर फोर ऑल या प्रकल्पाच्या माध्यमातून भूम मध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसाय महिलांचे लघुउद्योग व्यवसायाची उभारणी झालेली आहे. या कार्यक्रमासाठी नियोजन प्रकल्प समन्वयक अक्षय खराडे, अर्चना सातपुते, सोनाली डोरले, माधुरी वारे, मोहिनी गोडसे, शितल खैरे, अर्चना कुंभार, प्रतीक्षा महानवर, अश्विनी गपाट उपस्थित होते.


 
Top