ताज्या घडामोडी

 

तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर कडे येणाऱ्या काही रस्तांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होत असल्याने हे रस्ते अधिकारी यांच्या साठी सोन्याची अंडे देणारी कोंबडी ठरत आहेत. सध्या येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचा दुरुस्ती कामावर  जोर दिसत असल्याने या रस्त्यावर मागील दहा वर्षा पासुन झालेल्या दुरुस्ती खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर खुर्द ते केशगाव, हंगरगा पाटी ते कसई यासह अनेक रस्ते शारदीय नवराञ तोंडावर गेली अनेक वर्षापासुन दुरुस्ती कामे निघुन यावर लाखो रुपयाची उधळपट्टी होत आहे दुरुस्ती करताना कामाचा  दर्जा राखला जातो कि नाही हे पाहणे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे तरीही दवर्षी पावसाळा संपताच दुरुस्ती कामांची पोलखोल होत  असुन या रस्त्यावर जागोजाग खड्डे पडत आहे. दुरुस्ती रस्त्यावर नवराञोत्सव पुर्वी जागोजागी खड्डेच खड्डे पडत असल्याने  रस्त्याची अवस्था दयनीय होत आहे. जागोजागी खड्डे पडल्याने दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. वाहनधारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते.

बहुसंख्य वाहनधारक, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना आणि ये-जा करणाऱ्या भाविक भक्तांना या रस्त्यावरून प्रवास करणे सध्या मुश्कील झाले आहे.  रस्त्यावर पडलेल्या खड्यांतून वाहने घेऊन जाताना वाहनचालक.रस्त्यावरील खड्डे आता अपघाताला आमंत्रण देताना पाहायला मिळत आहेत. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारे  आणि  तिर्थक्षेञ अक्कलकोट ला जाये करणारे  बहुसंख्य वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे मोटारसायकल, तीनचाकी, एस. टी.बस, मालवाहतूक आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन सोन्याचे अंडे देणारे रस्ते काम दर्जदार होण्यासाठी  अक्कलकोट दुधनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा अभियांत्यांनी लक्ष देण्याची मागणी होत.


 
Top