धाराशिव  (प्रतिनिधी) - धनगर समाजास एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळण्यासाठी एस.टीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.30 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देऊन त्याचा लाभ मिळावा यासाठी धनगर समाजाची धाराशिव शहरातील जत्रा फंक्शन हॉल येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीस लिंबराज डुकरे, दत्ता बंडगर, प्रा सोमनाथ लांडगे, लिंबराज डुकरे, श्रीकांत तेरकर, मुकुंद घुले, ऍड किरण चादरे, देवा काकडे, दिनेश बंडगर, बालाजी वगरे, गणेश एडके, नरसिंग मेटकरी, अशोक गाडेकर, संतोष वतने, विशाल वाघमारे, गणेश सोनटक्के, आकाश कानडे, ओंकार देवकते, माऊली हुबाले, रोहित पसारे, सागर दाणे, किशोर डुकरे, महेश मोटे आदींसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top