तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण  साठी केलेल्या आमरण उपोषण मुळे घराघरात पोहाचलेले मनोज जरांगे पाटील हे दिपावली भाऊबीज किट व लग्नपञिके वर पोहचले आहेत. राजकिय नेत्यांची जागा आता मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याचे तुळजापूर येथे विनोद गंगणे मिञ परिवारा तर्फ वाटप करण्यात करण्यात आलेल्या भाऊबीज किट वर मनोज जरांगे पाटलांच्या छापलेल्या फोटो व छबीवरुन दिसुन येते.  

येथे मनोज जरांगे यांचे फोटो असलेले चर  हजार किट ज्यात दिपावली साजरी करण्याचे साहित्य असलेले वाटप करण्यात आले. कुठल्याही कुटुंबातील लग्न सोहळ्याच्या

निमंत्रण पत्रिकेवर पूर्वी देवदेवतांचे फोटो छापले जायचे पण  मराठा आंदोलनातुन लोकाभिमुख झालेल्या मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांचे आता दिपावली भाऊबीज भेट किट तसेच लग्न व  निमंत्रण पत्रिकेवर दिसु लागले आहे. गेल्या महिन्यापासून राज्यात केवळ आणि केवळ मराठा आरक्षण हाच एकमेव विषय राज्यात चर्चेला आहे. माध्यमातील सगळी जागा मराठा योद्ध मनोज जरांगे पाटील यांनीच घेतली आहे. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यावरच महाराष्ट्र केंद्रित झाला आहे. एक सामान्य कुटुंबातील मराठा नेता उदयास आला आहे. 

साधेपणाचे आणि त्याच्या प्रामाणिकतेचे हे यश आहे. कुठल्याही अमिषाला बळी न पडणारे असल्यामुळे, आणि मराठा समाजाचे दुःख घेवून लढत असल्यामुळे मराठा समाजाचे तर ते गळ्यातील ताईत होऊन बसले आहेत. पण आता ते दिपावली भाऊबीज भेट व  मराठा समाजाच्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर जाऊन बसले आहेत.  विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मराठ्यांचा योद्धा' म्हणून मनोज जरांगे यांचे मोठी छायाचित्र छापण्यात येवु लागले आहे. एकीकडे सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमातून फक्त जरांगे पाटील दिसत असताना, लोकांच्या मनामनात केवळ त्यांनीच जागा व्यापली असताना, आता मराठ्यांच्या विवाह सोहळ्यातील निमंत्रण पत्रीकेवरही मनोज जरांगे पाटील आले आहेत. समाजाच्या मनात जरांगे पाटील किती खोलवर रुजले आहेत याचीच प्रचीती येताना दिसत आहे. स्वाभाविकपणे या दिपावली भाऊबीज किटवाटप 

चर्चा सगळीकडेच सुरु असून, सोशल मीडियात देखील या निमंत्रण पत्रिकेचा बोलबाला दिसू लागला आहे.


 
Top