धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील मेघमल्हार सभागृहात कलाविष्कार अकादमी धाराशिव व मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पद्मसिंह पाटील प्रायोजित मानाचे राज्यस्तरीय कै. श .मा पाटील पुरस्कार पद्य विभाग डॉ. शिवाजी शिंदे सोलापूर, कै. माधव गरड गद्य विभाग आशिष देशपांडे पुणे, कै. त्र्यंबक दादा शेळके सामाजिक संस्था विभाग अन्नपुर्णा ग्रुप धाराशिव यांना जि.प.मा उप अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील , विचारवंत प्रो एम. आर. कांबळे, उच्च न्यायालयातील विधीज्ञ रमेश नाईकनवरे, कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे, मसाप अध्यक्ष नितीन तावडे, पाटील, गरड, शेळके यांचे कुटुंबीयांच्या हस्ते पुरस्कारचे वितरण करण्यात आले. या समारंभासाठी कलाविष्कार अकादमी चे मार्गदर्शक पं. दिपक लिंगे, राजेंद्र अत्रे सौ. वर्षा नळे सह साहित्य रसिक भा.न. शेळके, उद्योजक संतोष शेटे, प्रविण काळे, मदन पवार, संभूदेव खटिंग, बापू शेळके ,विनोद गपाट, प्रशांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राजेश कारंडे, अविनाश मुंढे, विक्रांत नळे, वेदांत गुरव, वैभव वाघचौरे यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचालन हनमंत पडवळ यांनी केले. तर आभारप्रदर्शन कलाविष्कार अकादमीचे सचिव शेषनाथ वाघ यांनी केले.