धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील मूळ रहिवाशी शिक्षक सुधीर कुलकर्णी यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने बिहार येथे बुधवारी दि.22 नोव्हेंबर रोजी निधन झाले. धाराशिव येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि.25 रोजी अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षक, संस्थाचालक, उद्योजक आदी क्षेत्रात गरूड भरारी घेतली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, दोन बहिण असा परिवार आहे. गुरूवर्य शिक्षक कै. कुलकर्णी यांना सहशिक्षक सतीश शहाजी कुंभार (आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी संघटना, धाराशिव) यांनी अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण केली.  


 
Top