धाराशिव (प्रतिनिधी)-दि.26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन असुन दि.26 नोव्हेंबर 2023 पासुन भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली. रॅलीत संविधान उद्दैशिकाच्या प्रती वाटप करुन वाचन करण्यात आले. रॅलीतील भारतीय संविधान जिंदाबाद,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणला. तर आम्ही भारताचे लोक या गीताने चैतन्य निर्माण केले.सहभागी शाळा कॉलेज अधिकारी कर्मचारी यांना सन्मान पत्र देऊन संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व रॅलीस सुरुवात केली. 

शहरवासीय, विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. तर रॅलीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा पोलीस विभाग,जिल्हा परिषद शिक्षण विभाग,नर्सिंग विद्यार्थी,विधीज्ञ मंडळ,सामाजिक संस्था,संघटना व इतरांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. रॅलीचे आकर्षण जिल्हा पोलिस बॅण्ड पथक ठरले,हा राष्ट्रीय सण उत्सव असुन रॅली दरवर्षी प्रमाणे बार्शी नाका मॉ जिजाऊ चौक येथुन सुरुवात झाली.रॅलीत माजी नगरसेवक राणा बनसोडे यांचा ट्रॅक्टर ट्रॉलीत संविधान रथ आकर्षक सामील केला होता. सचिन चौधरी यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्ताची सोय केली होती. मृत्युंजय बनसोडे यांनी संविधान उद्देशिकाचे आकर्षक फोटो छोट्या रथात मांडले होते. तर राजरत्न शिंगाडे यांनी भारतीय संविधान ग्रंथ देऊन संविधान रॅलीस शुभेच्छा दिल्या. रॅलीचे स्वागत श्रीपतराव भोसले हायस्कुल समोर नामदेव वाघमारे, तर पर्यटन जनजागृती संस्थेचे अध्यक्ष युवराज नळे यांनी शुभेच्छा दिल्या. आरपी कॉलेज समोर विवेक जाधव,सम्यक विद्यार्थी आंदोलन,चर्च समोर चर्चचे फादर व ख्रिस्ती समाज बांधव,लेडीज क्लब,आर्य समाज मंदिर चौकात देवानंद एडके,शिवसेना ठाकरे गट, अंबाला हॉटेल चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ,त्रिशरण चौक जिल्हा काँग्रेस कमिटी,माया चव्हान महिला मंडळ तर्फे बिस्कीट वाटप,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया समोर राजाभाऊ ओव्हाळ,विद्यानंद बनसोडे आरपीआय (आ),मारवाडी गल्ली किरणताई निंबाळकर तर्फे लाडु वाटप करण्यात आले.


 
Top