धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे दि.26 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या धाराशिव हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून अनेक धावपटूंनी  सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 45 ते 60 वयोगटांमध्ये धाराशिव शहरातील सौ. महानंदा मल्हारी माने या गृहिणीने 21 किलोमीटर अंतर 2 तास 39 मिनिटांमध्ये पूर्ण करून सर्व द्वितीय क्रमांक मिळवून बक्षीस पटकावले आहे.

प्रथम क्रमांक लातूर मधील वैशाली इंगोले या महिलेने पटकावला असून त्यांनी हे अंतर 2 तास 38 मिनिटांमध्ये पूर्ण केले आहे. मागील वर्षी सौ.महानंदा माने यांनी 10 किमी स्पर्धेमध्ये सर्वप्रथम क्रमांक मिळवला होता. वयाची 49 वर्षे पूर्ण केलेल्या आणि तीन वर्षाच्या नातवाची आजी असणाऱ्या सौ. महानंदा मल्हारी माने या महिलेने संसाराची पूर्ण जबाबदारी सांभाळून हे कठीण यश प्राप्त केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर मधून कौतुक होत आहे.


 
Top