धाराशिव (प्रतिनिधी)- सेवापुर्तीनिमित्त मुख्याध्यापक धर्मराज मडके यांचा सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला. कळंंब तालुक्यातील नागझरवाडी सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझरवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक चौरे अंबादास, हनुमंत मडके ,चेअरमन मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज, बाळकृष्ण तांबारे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिक्षक संघटना, धर्मराज काळमाते गट शिक्षण अधिकारी प्राचार्य संजय मकरवार,केंद्र मोहास तील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक तेरणा विद्यालयाचे माजी प्राचार्य व तेरणा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी भालचंद्र हुच्चे तसेच हनुमंत पडवळ, रावसाहेेब घुुटे, देशमुख गणपत,सतीश कुंभार,विविध शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षक व गावकरी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टिफिन डब्बे मडके यांच्या वतीने देण्यात आले. दरम्यान अनेक मान्यवरांनी मडके यांच्या कार्याचा उल्लेख आपल्या मनोगात केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र हुच्चे यांनी ही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अवधूत यांनी केले.