परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी भाजपाच्या नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या व मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून परंडा तालुक्यातून नियुक्त झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे यांनी सत्कार केला.
भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष व लोणीचे माजी सरपंच सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीसपदी माजी जिल्हा चिटणीस रामचंद्र उर्फ विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीसपदी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष व जिल्हा मजूर संघाचे माजी संचालक राजकुमार पाटील आणि भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल तिपाले तसेच भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड. संतोष सुर्यवंशी यांची नियुक्ती झाल्याबद्दल या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.