तुळजापूर (प्रतिनिधी)-युवानेते विनोद पिटू गंगणे मिञपरिवार यांच्या वतीने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील कुंटुंबातील महिलांना  दिवाळी साजरी करण्यासाठी भाऊबीज किट  भेट वाटप हाडको मैदानावर महंत तुकोजीबुवा, महंत इछागिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दि 10 नोव्हेंबर रोजी सांयकाळी वाटप करण्यात आले. यावेळी चार हजार कुंटुंबाला दिवाळी भाऊबीज भेट वितरीत करण्यात आली. यात सर्वजाती धर्माचा मुस्लीम महिलांनाही ही भाऊबीज भेट देण्यात आली.                        

यावेळी महिलांच्या वतीने विनोद गंगणे यांचा सत्कार करण्यात आला. गेली पंधरा वर्षापासून विनोद गंगणे हा उपक्रम राबवत आहे. या  प्रसंगी व्यासपीठावर महंत तुकोजीबुल महंत इछागिरी महाराज जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य माजी, जिल्हाअध्यक्ष नितीन काळे, सुरेश देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, सतिश दंडनायक, माजी नगराध्यक्ष अर्चनाताई विनोद गंगणे,  विनोद  गंगणे जिल्हा मजुर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सज्जन सांळुके, बाळासाहेब शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिन पाटील अदि मान्यवर उपस्थितीत होते. 

यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले कि विनोद गंगणे व त्यांचे सहकारी मागील पंधरा वर्षा पासुन विविध माध्यमातून सर्वासामान्यांना मदतीचा हात देतात तो उपक्रम स्तुत्य असल्याचे स्पष्ट केले. तिर्थक्षेञ तुळजापूरचा विकास पाच वर्षात तिर्थक्षेञ तिरूपती व शिर्डी धर्तीवर करणार असल्याचे सांगुन तिर्थक्षेञ विकासात मदत करा तुमचे अर्थिक उत्पन्न निश्चित वाढवीन अशी मी ग्वाही देतो असे यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मदतीवर भर देत आहेत असे यावेळी स्पष्ट केले. करोनाचा संकटात दिवाळीच्या आनंदाच्या काळात विनोद गंगणे व त्यांचे सहकारी शहरवासियांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले.  असे शेवटी म्हणाले. यावेळी बोलताना विनोद गंगणे म्हणाले कि      माझ्या माताभगिनीना दिवाळी साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबवत असुन आपण याचा स्विकार करीत असल्याने मी आपले आभार व्यक्त करतो असे यावेळी म्हणाले.                 माजी सभापती विजय गंगणे, विशाल रोचकरी, भाजप शहराध्यक्ष शांताराम पेंदे, सज्जनराव साळुंखे, औदुंबर कदम, नागेश नाईक, पंडीत जगदाळे, किशोर साठे, माऊली राजे, भोसले नरेश, अमृतराव, गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, विजय कंदले, अविनाश गंगणे, पलंगे, मनोज गवळी, अमर हंगरगेकर, लखन पेंदे, आबा रोचकरी, विशाल छञे, राजेश शिंदे, राजाभाऊ देशमाने, सुहास सांळुके, अभिजीत कदम, राजेश्वर कदम अदि मान्यवर उपस्थितीत होते. प्रास्तविक नगराध्यक्ष सचिन रोचकरी करताना म्हणाले जिल्हा चा विकासासाठी  आराणाजगजितसिंहजीपाटील व शहर विकासासाठी विनोद गंगणे यांना खंबीर साथ द्या असे आवाहान   केले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश मगर यांनी केले. तर आभार विनोद गंगणे यांनी मानले. यावेळी शहरवासिय मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top