तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद, रामतीर्थ ग्रामपंचायतींच्या नूतन लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद, रामतीर्थ, येडोळा येथील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या यावेळी जनतेतून सरपंचाची थेट निवडणूक होती. यामध्ये आलियाबाद च्या सरपंचपदी काँग्रेसचे सुर्यकांत मोतीराम चव्हाण यांची तर रामतीर्थ च्या सरपंचपदी काँग्रेसच्या फुलाबाई लक्ष्मण राठोड यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच नुतन सदस्य मोताबाई राठोड, शांताबाई राठोड, सीताबाई चव्हाण,शालुबाई पवार, दामाजी राठोड,तारू राठोड ,पवन चव्हाण, अमृता चव्हाण, सुर्यकांत राठोड, कांताबाई पवार, शांताबाई राठोड, कमळाबाई राठोड, चांगुणाबाई जाधव, शिवाजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश काँग्रेस सेवादल यंगबिग्रेडचे प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, माजी सभापती प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील, अँड ढवळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिजित चव्हाण, ऋषिकेश मगर, दिलीप सोमवंशी, अमोल कुतवळ, हरिष जाधव, शरणापा कबाडे,लक्ष्मण राठोड, श्रीनिवास पाटील,मनोज सोमवंशी नेमिनाथ चव्हाण, शिवाजी चव्हाण, महादेव राठोड, शिवाजी राठोड यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.