तेर (प्रतिनिधी)-दिवाळी म्हटली की,आपण दारासमोर, घरांवर तेलाचा दिप लावतो.परंतू तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू वस्तुसंग्रहालयात मातीपासून बनवलेले सातवाहनकालीन दिवे पहावयास मिळतात.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू वस्तुसंग्रहालयात मातीपासून बनवलेले सातवाहनकालीन विविध प्रकारचे दिवे पहावयास मिळतात. मातीचे दिवे,त्यांचे आकार, त्यावरील नक्षीकाम वैशिष्ट्यपुर्ण आहे.कांही दिवे लहान मुलांना गुटी घालण्यासाठी वापरले जात होते तसेच कांहीं दिवे लांबड चोंचिच्या वाटीप्रमाणे असून माथ्यावर विविध प्रकारची नक्षी आहेत.संग्रहालयातील पंचदिप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्यांच्या अग्रभागी चंबुसारख लहान भांडे बसविलेल असून त्यात तेलाचा साठा असतो.पप्रत्येक पाळयात समई. प्रमाणे वात असून पंचपाळयाच्या मागच्या बाजूस ठेवलेल्या छिद्रातून तेल पाळयात उतरत.

.आणखी एक विलक्षण असा दिवा इथे असून त्याला धरण्यासाठी बाजूला पकड सुद्धा आहे.या दिव्यांची अभिनव रचना केली आहे की, उजेड तर भरपूर पडला पाहिजे आणि तोही कमीतकमी तेलात.वाचता येण्याइतपत उजेड देणा-या या दिवा अनेक तास जाळण्यास फक्त तीन चार चमचे तेल लागते. या विविध प्रकारच्या जमिनीतवर, भिंतीवर, किंवा टांगून ठेवण्याच्या दिव्यानी दोन हजार वर्षांपूर्वीचा काळ उजळून टाकला होता यावर विश्वास बसत नाही.संग्रहालयातील विविध प्रकारचे सातवाहनकालीन दिवे पहाण्यासारखे आहेत.


 
Top