भूम (प्रतिनिधी)- मराठा समाजास आरक्षण मिळावे या करीता मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील अनेक छोट्या- मोठ्या गावांमध्ये मराठा समाज बांधव मोर्चा, आंदोलने, उपोषण करत आहेत. या आंदोलनात सहभागी होत भूम शहरतील व तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत दि.1/11/2023 रोजी  संध्याकाळी भव्य असा हालगीच्या निनादात कँडल मार्च काढत शासनाचा निषेध केला. 

यावेळी 'जय जिजाऊ जय शिवराय, तसेच 'एक मराठा लाख मराठा'व ‌‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है', उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो' अशा घोषणांनी दिक्षी गाव दुमदुमून गेले होते. याप्रसंगी दिक्षी गावातील तरुण सहकारी, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच शासन मराठा आरक्षणाबाबत दिरंगाई करत आहे. न्यायालयीन पुर्तता करत नाही, मराठा सामाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहे. असा आरोप यावेळी नागरिकांनी केला.


 
Top