नळदुर्ग (प्रतिनिधी)- आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नळदुर्ग येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास दि.1 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राम्हण समाज संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असुन उपोषणस्थळी जाऊन ब्राम्हण समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण कर्त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. ब्राम्हण समाज संघटनेच्या वतीने मराठा समाजाच्या सुरू असलेल्या उपोषणाला उघडपणे पाठींबा देणारी नळदुर्ग शहर ब्राम्हण समाज संघटना ही राज्यांतील पहिली ब्राम्हण संघटना ठरली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपुर्ण राज्यातील मराठा समाज प्रत्येक ठिकाणी साखळी उपोषण, आंदोलन करीत आहे. नळदुर्ग येथे दि.30 ऑक्टोबर पासुन शहर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे., उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दि.1 नोव्हेंबर रोजी मराठा समाजाच्या या उपोषणाला व त्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राम्हण समाज संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. उपोषणस्थळी जाऊन ब्राम्हण समाज संघटनेने आपल्या पाठिंब्याचे पत्र सकल मराठा समाज संघटनेला दिले आहे. यावेळी ब्राम्हण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी महाराष्ट्र सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
यावेळी नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राम्हण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी, सचिव मुकुंद नाईक, बाळासाहेब कुलकर्णी, वसंतराव अहंकारी, सुधीर पुराणिक, मिलिंद भुमकर, अजय देशपांडे, विकास वैद्य, उमेश नाईक, शशिकांत कुलकर्णी, मुकुंद भुमकर, प्रमोद कुलकर्णी, प्रदीप ग्रामोपाध्ये, अजित भुमकर, सौरभ कुलकर्णी, सुशांत भुमकर, सदानंद नाईक, सुदर्शन पुराणिक, अनिल कुलकर्णी, अशोक वैद्य, दिलिप कुलकर्णी, प्रविण कुलकर्णी, सुहास पुराणिक व नंदकुमार जोशी आदीजन उपस्थित होते.