धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या सन 2023-24 या वर्षाकरिता समितीची नूतन कार्यकारिणी पदाधिकारी निवडीसाठी स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत नूतन कार्यकारणी समितीचे मावळते अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी यांनी जाहीर केली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष जयराज रंगनाथ खोचरे,उपाध्यक्ष गौरव अशोकराव बागल, सचिव आकाश मिलिंदराव कोकाटे, कार्याध्यक्ष देवानंद सुरवसे, सहकार्याध्यक्ष संतोष चोपडे, संघटक हनुमंत यादव, सहसंघटक विलास साळुंके, कोषाध्यक्ष गणेश पवार,सह कोषाध्यक्ष महेश अनपट, प्रवक्ता विशाल पाटील, सहप्रवक्ता सिद्धेश्वर मते, प्रसिद्धी प्रमुख सुरज शेरकर, सहप्रसिद्धी प्रमुख कुंदन जानराव, सोशल मीडिया प्रमुख समीर शेख, सोशल मीडिया प्रमुख प्रसाद वीर, कायदेशीर सल्लागार ॲड. धैर्यशील सस्ते यांच्या नेमणुका करण्यात आल्या. समितीचे अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी, शशिकांत खुणे, ॲड. संजय शिंदे, धनंजय साळुंके, बुबासाहेब उंबरे, अमोल शिरसाट, प्रभात मुंडे, गणेश पाटील, संतोष घोरपडे आदी उपस्थिती होते.


 
Top