नळदुर्ग (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी नळदुर्ग येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी या साखळी उपोषणात महिलाही सहभागी झाल्या. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा महिलांनी दिल्या. या उपोषणात संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ सहभागी झाले होते. भजन म्हणत त्यांनी उपोषण केले.

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असुन या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नळदुर्ग येथे तीन दिवसांपासुन सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. दि.1 नोव्हेंबर रोजी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी या साखळी उपोषणात महिला सहभागी झाल्या होत्या. या उपोषणामध्ये सुक्ष्म माने, सुमन किल्लेदार, मनिषा काशिद, विमालबाई काळे, पुजा जाधव, जयश्री चौधरी, उमा जाधव, राणी सुरवसे, पल्लवी जाधव, रेखा बेले, निर्मला काळे, शकुंतला जाधव, लक्ष्मी किल्लेदार, लता साळुंके, कस्तुरबाई जाधव, मंगलबाई टेकाळे, मिना जगताप व गुंडुबाई चौधरी या महिला सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजाला लवकरात लवकर राज्य सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी या महिलांनी केली आहे. या साखळी उपोषणात श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ सहभागी झाले होते यावेळी भजन म्हणत या भजनी मंडळाने उपोषणात आपला सहभाग नोंदविला.

यावेळी सकल मराठा समाजाचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, दीपक काशिद, तानाजी जाधव, बबन चौधरी,शिवाजी सुरवसे, उमेश जाधव,अरविंद माने, नेताजी किल्लेदार यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी संचारबंदी लागु केली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी नळदुर्ग शहरांतील बाजारपेठ बंद होती. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले.


 
Top