तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जळकोट येथील जिजाऊ नगर मधील राहुल किसन जाधव 34 या अविवाहीत मराठा समाजातील युवकाने मराठा आरक्षण साठी मी जीव देत आहे अशी चिठ्ठी लिहून स्वताचा घरात दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयाञा संपवल्याची घटना मंगळवार दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2. 30 वा सुमारास उघडकिस आली. या आत्महत्या केल्याची घटना घडल्याने मराठा समाजात खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणचा तुळजापूर तालुक्यात हा पहिला बळी गेल्याचे बोलले जात आहे. त्याचा पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. राहुल याच्या वडीलाला पाच एकर शेती असून राहुलला नोकरी मिळत नसल्याने तो टमटम चालवत होता. माञ तो मराठा आरक्षण आंदोलनात कायम आघाडीवर असे त्याचा या निधनाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.