तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण पार्श्वभूमीवर ऐकसंघ झालेल्या मराठा मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनात सताधारी विरोधकांकडून अप्रत्यक्ष प्रयत्न झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात चर्चिली जात आहे.

मराठा  संघर्ष योध्दा मनोज जरांगे  यांच्या उपोषणा नंतर सुरु झालेले मराठा आरक्षण आंदोलन प्रथमता बिगर राजकिय पध्दतीने यात गाव ऐकवटला पणते  कुण्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली नाही तर मराठा समाज नावाखाली एकञ आले. याला गावातील बारा बलतुदाराने या आंदोलनात स्वयंस्फुर्तीने सहभाग घेवुन मराठा आरक्षण आंदोलनमुळे जातीयवाद वाढतो कि काय अशी भिति वाटत असतानाच सर्वच समाजांनी यात स्वंयस्फुर्तीने सहभाग घेतल्याने जातीपातीच्या भिंती कोसाळुन या आंदोलनाची तीव्रता गावपातळीवर वाढली. मराठा आरक्षण आंदोलन देविच्या अश्विन पोर्णिमा उत्सव काळात वाढले पण त्याचा कुठलाही परिणाम भाविकांवर झाला नाही हे ख-या अर्थाने सर्वसामान्य मराठ्यांचे आंदोलन ठरले. सकल मराठा समाजाने हे आंदोलन बिगर राजकिय हाताळण्याचा प्रयत्न झाला. प्रथमता यात गावपातळीवरील सर्वच पक्षाचे नेते सकल मराठा म्हणून सहभागी झाले. माञ आंदोलनाला मिळलेला प्रतिसाद पाहताच उर्वरीत पक्षात आपल्या पक्षाची प्रतिमा आंदोलन विरोधक निर्माण होवु नये म्हणून काहीकाळ आंदोलन पासुन दूर असलेली नेते स्वयस्फुर्तिने सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनमुळे  तुळजापूर तालुक्यातील राजकिय पटलावर बरीच उलथा पालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

या बदलत्या राजकारणात महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांची कसोटी मतदारसंघातील मतदारांचा बदललेला कौल आणि बदलती राजकीय पार्श्वभूमी तालुक्याच्या  राजकारणाला वेगळ्या वळणावर घेऊन गेली आहे. या विधानसभा मतदारसंघात महायुती आपल्या जागा कायम राखणार की महाविकास आघाडी आपला झेंडा फडकवणार हे पहावे लागणार आहे. मात्र, राज्यातील बदलत्या राजकारणाने पक्ष व  नेत्यांचा कस लागणार आहे. या मतदारसंघाने यापूर्वीच्या एकतर्फी काँग्रेसला साथ दिली. माञ मागील विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाला साथ मिळाली तालुक्यातील बहुतांशी सहकारी संस्थांवर भाजपने वर्चस्व निर्माण करीत आहे. आता भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आ. राणाजगजितसिंह पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, ते पुनश्च दावेदार आहेत. त्यांनी स्वताहुन नको म्हटले किंवा पक्षाने लोकसभेसाठी उभे राहा म्हटले कि माञ येथुन विधानसभा उमेदवारी कुणाला मिळणार याची मोठी उत्सुकता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट येथे काय भूमिका घेणार हेही पहावे लागणार आहे.महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार यात वाद नाही तशी परिस्थिती दिसत आहे. काँग्रेसकडुन पुन्हा 84 वर्षाचे माजी मंञी मधुकर चव्हान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट आहे. राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलामुळे बदललेल्या भूमिकांमधून नेत्यांची कसोटी लागणार आहे.


 
Top