तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने आँक्टोबर अखेर रबीच्ये निर्धारीत  83422.40 हेक्टर क्षेञापैकी 14672 हेक्टर क्षेत्रात 17.59 टक्के पेरणी झाली आहे. यंदा रबी पेरणीत प्रचंड घट होण्याची मोठी शक्यता आहे. यंदा शेतकऱ्यांची दिवाळी निरुत्साही वातावरणात जाणार आहे. यंदा पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने जेमतेम आलेले रबी पिक काढल्यानंतर परतीचा पाऊस न बरसल्याने जमिनीत ओल नसल्याने पाऊस न पडल्याने पाणी नसल्याने यंदा खरीप पिकांवर सक्रांत आली आहे. रबीपिक, निर्धारीत क्षेञ पेरणी क्षेत्र टक्केवारी रबी ज्वारी- 40731.27- 13355- (32.79) टक्के. गहु - 7802.72- 340.00-(04.36) टक्के. मका-2225.71- 26.0-(01.17) टक्केफ इतर तृणधान्य-41.5-30(07.23). हरभरा-25100- 9450(03.76) टक्के.  इतर पिके (0). करडई -350.0-00(00) टक्के. जवस - 180.0-00(00) टक्के. तीळ-00-00(00) टक्के. सुर्यफुल- 160.0-00(00.00), इतर गळीत धान्य- 150.6- 30(01.99) टक्के.  पुर्व हंगामी ऊस-6648.0-120(00.18) टक्के.


 
Top