तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनाने दिपावली व नाताळ सुट्याच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेवुन 1 नोव्हेबर पासुन श्री तुळजाभवानी मंदीर गर्दी दिनी पहाटे 1.00 वाजता चरणतिर्थ होवुन दर्शनार्थ खुले केले जात आहे. सर्वसामान्य वर्गातील भाविकांना पहाटे कमी वेळात सुलभ दर्शन घडत असल्याने या नियोजनाबद्दल भाविक प्रशासनाला धन्यवाद देत आहेत.

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ कायम गर्दी असते सुट्या म्हटले की भाविकांची प्रचंड गर्दी होवुन तासोनतास रांगेत थांबुन ही भाविकांना सुलभ दर्शन मिळणे कठीण होत होते. यांचा फटका ज्यांना सशुल्क दर्शन घेणे परवडत नसल्याने त्यांना बसत होता. यात सर्वसामान्य वर्गातील शेतकरी, गोरगरीब यांना बसत होता. परंतु यंदा प्रशासनाने प्रथमच अश्विन पोर्णिमा होताच  दिनांक 01/11/2023 ते 31/12/2023 या कालावधीत मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा या दिवशी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून सकाळचे चरणतिर्थ पहाटे 1.00 वाजता होऊन पुजेची घाट सकाळी 06.00 वा होईल. तसेच अभिषेक सकाळी 06.00 ते 10.00 व सायंकाळी 07.00 ते 09.00 वाजता व अभिषेक कालावधीत देणगीदर्शन बंद असे नियोजन केल्याने सर्वसामान्य वर्गातील भाविक पहाटे लवकर उठुन श्री कल्लोळ गोमुख कुंडात स्नान करुन लगेच दर्शनार्थ जात आहे. पहाटे गर्दी नसल्याने कमी वेळात सुलभ दर्शन घडत आहे.


 
Top