धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण विभाग अंतर्गत उस्मानाबाद पोलीस मुख्यालय आवारात पोलीस लाईन येथे पोलीस सबसिडी अरी कॅन्टींन समोर पोलिसांसाठी व सर्वसामान्य नागरिकासाठी रसायणमुक्त आरोग्यदायी स्वच्छ व ताजे शेतकरी ते ग्राहक विक्री असे दर्जेदार स्वस्त ‌‘सेंद्रीय भाजीपाला व फळे विक्री केंद्र' सुरु करण्यात आले. या विक्री केंद्राचा शुभारंभ शनिवार, दि.18 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. 

हे सेंद्रीय भाजीपाला व फळे विक्री केंद्राचे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिकासाठी खुले असल्याचे सेंद्रीय भाजीपाला व फळे विक्री केंद्र चालविणारे राहुल सिंह यांनी यावेळी सागिंतले. तसेच सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक शेलार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे, राखीव पोलीस निरीक्षक अरविंद दुबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी, अमंलदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top