तुळजापूर (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा भाजप कार्यकारणीत सात जणांना जणांना स्थान मिळाले असुन यात नळदुर्ग, जळकोट, काटगाव आपसिंगासह अनेक जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप नेत्यांना या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे काही खुशी कही गम अशी स्थिती भाजपा कार्यकत्यांमध्ये दिसुन आली.
काही गावातील दोघांना या यादीत स्थान मिळाले आहे. तालुक्यात तालुकाध्यक्षपदी संतोष बोबडे यांना कायम ठेवले असुन नव्या चेहऱ्यात जिल्हा चिटणीसपदी प्रथमच शहरातील पल्लवी सचिन रोचकरी यांना स्थान मिळाले आहे. धाराशिव जिल्हयात भाजपचा फक्त आमदार राणाजगजितसिंह पाटील रुपाने तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे एकमेव आमदार आहेत. या यादीत नवे जुने यांना स्थान दिले आहे. या यादीत काँग्रेसचे संभाव्य उमेदवार माजी आमदार मधुकर चव्हाण निवास करीत असलेल्या अणदुर गावातील दोन भाजप नेत्यांना यादीत स्थान दिले आहे. या यादीत अणदूर दोन, काटी दोन, तुळजापूर एक, सावरगाव एक येथील भाजप मंडळीना स्थान मिळाले आहे. खालच्या पट्यातील भाजप कार्यकत्यांना यात मोठे स्थान मिळाल्याचे दिसुन येत आहे. तालुकाध्यक्षपदी संतोष बोबडे (सावरगाव), जिल्हा सरचिटणीसपदी दिपक आलुरे (अणदूर), जिल्हा चिटणीसपदी साहेबराव घुगे (अणदुर), पल्लवी रोचकरी (तुळजापूर), सिध्देश्वर कोरे (नंदगाव), जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रम देशमुख, आदेश कोळी (काटी) यांची निवड झाली आहे. या निवडीचे स्वागत होत आहे.