धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व धाराशिव जिल्हा तालीम संघ आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सुरू असलेल्या अटीतटीच्या लढतीला कुस्ती शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून मैदान प्रेक्षकांने गजबजून गेले .
या स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील व मुख्य कार्यवाहक युवा नेते, युवा उदयोजक अभिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विविध गटात सुरू असलेल्या स्पर्धा पाहण्यासाठी धाराशिव शहर व जिल्हा आणि महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचा प्रतिसाद मिळत आहे .
या स्पर्धा दोन सत्रात चालत असून महंत मावजीनाथ बुवा, दशावतर मठ तुळजापूर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सांळुके, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, भाजप राज्य कार्यकारणी सदस्य विनोद गपाट, अनील काळे, सुरेश कवडे, सुनील काकडे, हिंद केसरी अमोल बराटे, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, उपमहाराष्ट्र केसरी सागर गरुड, बाळासाहेब आवारे, वस्ताद बाळासाहेब पडघन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव धुमाळ, कार्याध्यक्ष संतोष शिवाजीराव नलावडे, सचिव वामनराव गाते, स्पर्धेचे व्यवस्थापक सुंदर भाऊ जवळगे, गोविंद घारगे, गोविंद पवार, बंडू गोचडे, सहसचिव मारुती खोबरे, पोलीस सहाय्यक निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अंधारे, जांबळे या मान्यवरांच्या उपस्थितीत तिसऱ्या दिवसाच्या सत्राचे उद्घाटन संपन्न झाले.
दि. 18 नोव्हेंबर रोजी शिवराज राक्षे विरुद्ध सुबोध पाटील यांची चुरशीची कुस्ती पाहण्यास कुस्तीप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती या लढतीत शिवराज राक्षे विजयी झाले. 65 किलो वजन गट गादी विभागात प्रथम सोनबा गोंगाने (कोल्हापूर शहर), द्वितीय अनिकेत मगर (सोलापूर), तृतीय क्रमांक केतन घारे (पुणे शहर) व विनायक मोळी (वर्धा जिल्हा) तर 65 किलो वजन गट माती विभागात प्रथम सुरज कोकाटे (पुणे जिल्हा), द्वितीय तुषार देशमुख (सोलापूर), तृतीय - सागर तामखडे (सांगली). तसेच 57 किलो वजन गट गादी विभागात प्रथम -अमोल बोगार्डे (कोल्हापूर), द्वितीय- दीपक पवार (पुणे शहर), तृतीय - स्वप्नील शेलार (पुणे जिल्हा) व महेश चौधरी (धुळे). तर 57 वजन माती गटात प्रथम सौरभ इगवे (सोलापूर शहर), द्वितीय अतुल चेचार (कोल्हापूर) व तृतीय कृष्णा हरणावळ (पुणे शहर). 74 किलो वजन गट गादी प्रथम - अक्षय हिसगडे (सोलापूर जिल्हा), द्वितीय - अक्षय चव्हाण (पुणे शहर), तृतीय मशिद शेख (सोलापूर) व लक्ष्मण चव्हाण (हिंगोली). तर 61 वजन गट माती गटात प्रथम - अमोल वालगुडे (पुणे जिल्हा), द्वितीय - ज्योतिबा अटकळे ( सोलापूर), तृतीय- प्रवीण वडगावकर (कोल्हापूर) या मल्लांनी बाजी मारली.