धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुका स्तरीय बाल संरक्षण समिती गठीत करण्यात आली असुन समितीच्या स्थानिक सामाजिक प्रतिनिधी पदी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची निवड करण्यात आली. शासन निर्णय 1 व 2 नुसार केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजनेच्या नियमावली नुसार बाल न्यास (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2000 (2006) च्या 81 फ व महाराष्ट्र बाल न्याय सुधारीत नियम 2011 च्या कलम 14 च्या (11-2) च्या (ड) नुसार बाल न्याय तसेच बालक विषयी इतर सर्व कायदे कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी करीता तालुका स्तरीय बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली असुन जिल्हाधिकारी सचीन ओम्बासे हे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अध्यक्ष आहेत. तर समितीचे अध्यक्ष धाराशिव तहसिलदार शिवानंद बिडवे असुन बाल विकास प्रकल्प अधिकारी समितीचे सचिव अनिल कांबळे आहेत. समितीत इतर विभागातील सदस्य आहेत. स्थानिक सामाजिक प्रतिनिधी पदी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांना निवडीचे पत्र सचिव अनिल कांबळे व किशोर वंजारवाडकर यांनी दिले. निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातुन त्यांना गौरविण्यात येत आहे.


 
Top