नळदुर्ग (प्रतिनिधी)- ब्राह्मण समाजाच्या अनेक मागण्यासाठी येत्या 30 नोव्हेंबर रोजी  नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राह्मण समाजाच्या वतीने एक दिवशीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे.

 दि.28 नोव्हेंबर पासुन जालना येथील ब्राह्मण समाजाचे नेते दिपक भाऊ रणनवरे हे आमरण उपोषणास बसत आहेत त्याला पाठींबा म्हणुन नळदुर्ग शहरात सर्व शाखीय ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने दि.30 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार रोजी नळदुर्ग नगरपरीषदेच्या समोर सकाळी 10 ते  5 या कालावधीत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती नळदुर्ग शहर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी दिली आहे.परशुराम आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर निर्मिती करण्यात यावे या मुख्य मागणीसह ब्राह्मण समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आहे.

या उपोषणाचे निवेदन आज नळदुर्ग शहराचे मुख्याधिकारी श्री.लक्ष्मण कुंभार आणि नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना आज देण्यात आले. या निवेदनावर नळदुर्ग शहर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी..सचिव मुकुंद नाईक,विकास कुलकर्णी,भाजपाचे सुशांत भुमकर,उमेश नाईक,मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी,सुहास पुराणिक,अजित भुमकर,अजय देशपांडे,संदीप वैद्य, शिरीष कुलकर्णी,चेतन दुबे,सुदर्शन पुराणिक, विशाल कुलकर्णी यांच्या सह्या आहेत.


 
Top