नळदुर्ग (प्रतिनिधी)- कै. तुकाराम एकनाथ काळुंके बाभळगावकर यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव व ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बोरामणी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार चिवरी येथील कवयित्री मुक्ताबाई राम सारणे यांना जाहीर झाला आहे.
शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी इटकळ येथील साई मंगलकार्यालयात दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण जेष्ठ साहित्यिक, कवी, कलावंत व विचारवंत योगीराज माने, महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सरपंच रामचंद्र आलुरे जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, सेवानिवृत्त प्राचार्य संगमेश्वर जळकोट, कवयित्री कविता पुदाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. असे आयोजक संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके, ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सचिव संगित शहा, उपाध्यक्ष प्रा.अनिकेत चनशेट्टी संत तुकाराम महाराज सामाजिक संस्थेचे सचिव विलास काळुंके यांनी कळविले आहे.