धाराशिव (प्रतिनिधी)- सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर हा जन्मदिवस यानिमित्त 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.आज 31 ऑक्टोबर रोजी धाराशिव येथील लाचलुचपत विभाग कार्यालयात सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. 

तुळजापूर येथे नवीन बसस्थानक शासकीय कार्यालय,बस थांबा व आठवडे बाजार येथे अधिकारी व अंमलदारांनी भ्रष्टाचार निर्मूलन संबंधाने पोस्टर्स लावून पॉम्प्लेटचे वितरण केले. धाराशिव येथील आयोजित कार्यक्रमात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे व त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक विकास राठोड, नानासाहेब कदम,अमलदार इफतेखार शेख,दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव,अर्जुन मार्कड, सचिन शेवाळे, आशिष पाटील,दत्तात्रय करडे, विशाल डोके, सिद्धेश्वर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर व जाकेर काझी  यांची उपस्थिती होती.


 
Top