भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील पाटसांगवी येथील लक्ष्मण साधु आडागळे यांचा वृद्ध काळाने मृत्यु झाला असून त्यांच्या लहान नातवंडानी दिपावलीच्या फटक्या साठी गल्ल्यात साठवून ठेवलेल्या पैशाने आजोबाच्या आस्थी राखेवर स्मरण म्हणून फळझाडांचे वृक्षारोपन केले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेना भूम-परांडा-वाशी विधानसभा प्रमुख, दै सामना भूम तालुका पत्रकार प्रल्हाद आडागळे यांचे वडील लक्ष्मण साधु आडागळे वय 85 वर्षे त्यांचे पाटसांगवी येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ऐन दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मण आडागळे आजारी पडले. यामूळे कुटूबातील लहान मुलांनी दिवाळीचा सण साजरा केला नाही. दिवाळीच्या सणासाठी गल्ल्यात साठवून ठेवलेले पैसे त्यामधुन आंबा, जांभळ, चिकू, मोसंबी, संत्री, नारळ, रामफळ यासह वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपन केले आहे. कुटुबामध्ये लहान नातवंडे कु. यशराज कांतीलाल आडागळे, कुमारी श्रेया आडागळे, कुमार हिंदुराज आडागळे, कुमारी हिंदवी आडागळे, कुमार सोहम आडागळे, कुमार शिवसमर्थ आडागळे, कुमारी आराध्या आडागळे, कुमारी वैष्णवी चोळसे यांचा सामावेश आहे. यावेळी पत्रकार प्रमोद कांबळे, धनंजय शेटे, अशिष बाबर, आजित बागडे, प्रा. बप्पा कांबळे यांच्या सह धनंजय सर्वे, तात्या सुर्वे, कुटूंबातील सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते.


आम्ही भूम या ठिकाणी राहतो. मी गावाकडे गेलो कि आम्हाला बाबा पाच-दहा रुपये देयचे. बिस्कीट पुढे, कुरकुरे देयचे. आमचे बाबा चिडचिडे स्वभावाचे होते. बाबा जर बाहेर कुठेही असले तरी आम्ही गावाकडे घरी आलो आहोत म्हणून समजले कि लगेचच धावतच काटी टेकवत यायचे. आता आमचे बाबा आम्हाला सोडून गेले. त्याची आठवण म्हणून आस्थीवर केशर आंब्याचे झाड लावले आहे.

- कुमार हिंदुराज प्रल्हाद आडागळे, वय 8 वर्षे


 
Top