धाराशिव (प्रतिनिधी)-पोलिसांनी अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीसह 20 लाखांचा अवैध गुटखा जप्त केला. याप्रकरणी गाडीच्या चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा यांचे पथकास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन एक स्कॉर्पिओ गाडी ही चिंचकोट ते उजळम रस्ता उमरगा येथुन जात आहे. त्यावर पथकाने लागलीच तेथे जावून जाणारे- येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र एम.एच. 14 डी एफ 3040 स्कॉर्पिओ हे वाहन पेट्रोलिंग दरम्यान चेक केले. त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. वाहनात रजनीगंधा सुगंधीत मसाला 100 ग्रॅम 180 टिन असलेले 14 बॉक्स, रजनीगंधा सुगंधीत मसाला 1 कि ग्रॅ, बाबा नवरत्न मसाला 100 ग्रॅम 10 टिन, बाबा नवरत्न पान मसाला 1 कि. ग्रॅ, आर. एम.डी. पान मसाला 20 बॉक्स, एम सेनटेंड टोबॅको 20 बॉक्स, बाबा 120 प्रिमियम चुविंग टोबॅको ग्रॅम 14 टिन, बाबा 54 प्रिमीयम चुविंग टोबॅको 200 ग्रॅम चे 14 टिन, बाबा ब्लॅक डिलक्स चुविंग 1 किं ग्रॅ 48 टिन, बाबा ब्लॅक टोबॅको 50 ग्रूम 350 ग्रॅम बॉटल 300  असा एकुण 11 लाख 99 हजार 180 किंमतीचा माला सह स्कॉर्पिओ वाहन अंदाजे किंमत 8 लाख असा एकुण 19 लाख 99 हजार 180 रूपये किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करण्यात आला.  दोन आरोपी आजिम आयुब उमाटे, वय 34 वर्षे, रा. कपिलनगर खाडगाव रोड, लातुर ता.जि. लातुर, सज्जाद ईस्माईल सय्यद, वय 36 वर्षे, रा. औसा मोड, हाश्मीनगर औसा ता. औसा जि. लातुर याचे विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड करत आहे.

सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली मउपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पारेकर, उपविभागीय कार्यालय उमरगा यांचे पथकाने केली.


 
Top