भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील माणकेश्वरच्या कु.आर्या उमाप ही 15 वर्षाखालील मुलींच्या राज्याच्या निवड चाचणी सामन्यात सोलापूर संघाकडून खेळताना धाराशिव विरुद्ध नाबाद 128 धावा, सांगली विरुद्ध नाबाद 107 धावा, एम.सी.ए. विरुद्ध 59 धावा, जालना विरुध्द 46 धावा, मुंबई विरुध्द 43 धावा, बडोदा विरुध्द 75 धावा. आतापर्यंत खेळलेल्या 70 सामन्यात 2 शतके आणि 9 अर्धशतकांसह जवळपास 1800 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर यष्टीरक्षण करत असताना 79 खेळाडूंना बाद केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अंडर 15 मुलींच्या महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.

आर्याची कठोर मेहनत आणि वडिल पोपट सुखदेव उमाप यांचे योग्य मार्गदर्शन यामुळे अवघ्या दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीतच तिने संपादन केले आहे. या निवडीबद्द्‌‍ल आणि 17 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय सामन्यासाठी तिला शुभेच्छा देऊन तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top