तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पुर्वीच्या नऊ दिवसाच्या मंचकी निद्रेस भाद्रपद वध अष्टमीस म्हणजे शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर रोजी राञी आरंभ झाला.          

श्रीतुळजाभवानी मातेची  मंचकीनिद्रा  ही  अश्विन शु.1 शके  रविवार दि. 15 रोजी पहाटे पर्यत चालणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना होवुन शारदीय नवराञ उत्सवास आरंभ होणार आहे.  शुक्रवार सकाळी सुवासनी, आराधी मंडळीनी कापुस विंचण्यास आरंभ केला. नंतर तो मुस्लीम धर्मिय पिंजारी परिवाराने पिंजुन दिला. तो गाद्यात भरला गेला तो पर्यत पलंगे परीवाराने देवीचा मंचकी निद्रेसाठी शेजघर तयार केले.               

सायंकाळी 6.00वा  घाट देणे व पुजेस हाक मारल्यानंतर देविजींना दहीदुधपंचामृतअभिषेक 

पंचामृत स्नान, शुध्दस्नान घालण्यात आले नंतर देविजींची मुर्ती मुख्य गर्भगृहातुन शेजघरात आणुन  मंचकि निद्रस्त करण्यात आली. नंतर देविजींची मंचकावरील प्रक्षाळ पुजा, नैवेध व शेजारती करण्यात येवुन देविजींच्या मंचकी निद्रेस आरंभ झाला. श्री तुळजाभवानी मातेची मुळ मुख्य मुर्ती वर्षभरात 21 दिवसासाठी शेजारील शेजघरात चांदीच्या पलंगावर निद्रस्त केली जात. शारदीय नवराञ पुर्वी, नंतर सिमोल्लंघन सोहळ्यानंतर व शांकभरी नवराञोत्सव पुर्वी देविजींची मंचकी निद्रा असते.


 
Top