धाराशिव (प्रतिनिधी)-आज दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षण संचालक महेश पालकर शिक्षण संचालक शिक्षण संचनालय यांनी तसेच लातूर विभागीय उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, श्रीमती सुधा साळुंखे मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे तसेच विस्तार अधिकारी काझी  यांच्या समवेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे दुपारी ठीक एक वाजता शाळेस सदिच्छा भेट दिली.

सहावी सातवी वर्गास भेट देऊन गुणवत्तेची पाहणी केली. तसेच नवीन इमारत  शालेय कामकाज सर्व लाभार्थी योजनांचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने सर्वांचे शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन स्वागत   शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी व इतर शिक्षक यांनी केले. यावेळी शिक्षक वृंद उपस्थित होते.


 
Top